मतदारांना भेटण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती
लोकसभा निवडणूक – २०२४
रत्नागिरी – ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोग, नवी देहली यांच्याकडून नागरिक आणि मतदार यांना भेटण्यासाठी सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिली आहे.
मतदारांसाठी भेटण्याचे ठिकाण आणि भ्रमणभाष क्रमांकाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. निवडणूक निरीक्षक, सर्वसाधारण भुवनेश प्रताप सिंग (आय.ए.एस्.) यांना सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणभाष क्रमांक – ८७६७२३६६१४ असा आहे. निवडणूक निरीक्षक, पोलीस सुधांशु शेखर मिश्र (आय.पी.एस्.) यांना सकाळी ११ ते दुपारी १
वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळ नाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणभाष क्रमांक – ७६२०४४४६४५ असा आहे. निवडणूक निरीक्षक, खर्च अंकुर गोयल (आय.आर्.एस्) दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळनाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणभाष क्रमांक – ८७६६९८१८४६ असा आहे.