अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील स्वामी समर्थ यांचे आध्यात्मिक सुविचार
कोटी कोटी प्रणाम !
आज श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
१. एकदा स्वामींना विचारले, ‘‘तुमच्या देवाचे नाव काय ?’’ ते म्हणाले, ‘‘आमच्या देवास ‘नृसिंहसरस्वती’ म्हणतात. माझे नाव ‘नृसिंहभान’ आहे.’’
२. तुला ब्रह्म दाखवतो.
३. तुझ्या मनात कांक्षा आली. आम्ही तुझ्या घरी जेवत नाही.
४. तुझे मोठेपण तुझ्या घरात, येथे मोठेपण कशास पाहिजे ? असे बुदबलचे राजे आम्ही पुष्कळ बनवतो.
५. उतावळा सो बावळा, धीर सो गंभीर।
६. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.
७. बोरीच्या झाडाची महिलेने सेवा करावी, म्हणजे तिला अग्निसारखा पुत्र होईल.
८. काळजी का करतोस ? आम्ही तिच्यासाठी खंड्या नेमला आहे.
९. आमची नोकरी कर, म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील आणि तुझे गाठोडे आम्हास दे.