Rajnath Singh On POK: पाकव्याप्त काश्मीरचे लोक स्वत: भारताचा भाग बनू इच्छितात ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह


नवी देहली – जम्मू-काश्मीरमधील स्थिती लक्षणीयरित्या सुधारली आहे. पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्यासाठी भारताला बळाचा वापर करावा लागणार नाही; कारण तेथील लोक स्वत: भारताचा भाग बनू इच्छितात, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह म्हणाले की,

१. काश्मीरमध्ये स्थिती सुधारली असून तेथे लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत; मात्र त्यासाठी त्यांनी कुठलीही मुदत दिली नाही.

२. ‘काश्मीरमध्ये ज्या प्रकारे परिस्थिती सुधारत आहे, ती पाहून मला वाटते की, एक वेळ अशी येईल, जेव्हा तेथे ‘आफ्स्पा’ची (‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट’ची) आवश्यकता भासणार नाही. हे माझे मत आहे आणि यावर गृहमंत्रालयाने निर्णय घ्यायचा आहे.

३. भारत आणि चीन सैन्यांमध्ये मे २०२० पासून संघर्ष चालू आहे. दोन्ही देशांमधील सीमा विवाद अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही; मात्र अनेक वादग्रस्त सूत्रांवर दोन्ही बाजूंनी माघार घेतली आहे.