Saddam Hussein stabbed police: दलित मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सद्दाम हुसेनने पोलीस निरीक्षकावर केला चाकूने वार !
|
धारवाड (कर्नाटक) – येथील हुब्बळ्ळी नवानगर भागातील सद्दाम हुसेन याला एका अल्पवयीन हिंदु दलित पीडितेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जात आहे. त्याने ३ मे या दिवशी २ पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण करून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत हुसेनच्या पायाला गोळी लागली. यामध्ये धारवाड विद्यागिरीचे पोलीस निरीक्षक संगमेश बिदिगिनल घायाळ झाले.
१९ वर्षीय हुसेनने पीडितेशी आधी मैत्री केली आणि नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात फासले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि तिला धमकावले. बलात्कारामुळे पीडिता गर्भवती झाली आहे. तिला रुग्णालयात भर्ती केल्यानंतर सर्व सत्य समोर आले आणि हुसेनच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिका
|