महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज मिरज येथे पदयात्रेचे आयोजन !
नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ‘विकसित भारत @ २०४७ ’या विषयावर चर्चासत्र !
मिरज, ४ मे (वार्ता.) – सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ ५ मे या दिवशी सकाळी १० वाजता मिरज येथे महायुतीच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार विनयजी सहस्रबुद्धे यांच्यासह भाजप आणि मित्र पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपचे हितचिंतक या पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.
सदरची पदयात्रा बालगंधर्व नाट्यगृह, तांदूळ मार्केट, लक्ष्मी मार्केट, सराफ कट्टा, शनि मारुति मंदिर, गणेश तलाव मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येऊन या ठिकाणी पदयात्रेचा समारोप होणार आहे. तरी भाजप आणि महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे, तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘विकसित भारत @ २०४७’ या विषयावर येथील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ५ मे या दिवशी सकाळी ८ वाजता ‘संवाद सभा आणि चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले आहे.