सोंटू जैन याची मालमत्ता मोजण्यासाठी ताबा घेण्यापूर्वी ४० कोटी रुपये जमा करा !
‘ऑनलाईन गेमिंग’ फसवणूक प्रकरण
न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
नागपूर – ‘ऑनलाईन गेमिंग’ फसवणूक प्रकरणातील सट्टेबाज (बुकी) अनंत उपाख्य सोंटू जैन याच्या घरी जप्त केलेल्या मालमत्ता मोजण्यासाठी ताबा घेण्यासाठी (‘कस्टडी’साठी) ४० कोटी रुपयांचे हमीपत्र (बाँड) जमा करा’, असे निर्देश जिल्हा सत्र न्यायालयाने आयकर विभागाला दिले.
गेल्या वर्षी जुलै मध्ये नागपूर पोलिसांनी गोंदिया येथील कथित बुकी सोंटू जैन याच्या घरी धाड टाकून १७ कोटी रोख आणि २ कोटी ४४ लाख रुपयांचे सोने-चांदी जप्त केली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सोंटू याने दुबई येथे पळ काढला होता. पोलिसांना अन्वेषणातून मिळालेल्या माहितीप्रमाणे सोंटू जैन याचे स्वतःचे ‘गेमिंग ॲप’ होते. त्याच्या माध्यमातून तो ॲप नियंत्रित करून खेळणार्याचा विजय किंवा पराभव नियंत्रित करत होता. त्यातूनच त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली होती.