श्री देव बोडगेश्वर मंदिरातील चोरीच्या प्रकरणी ६ मुसलमानांची टोळी कह्यात
मूळ बांगलादेशी नागरिकासह ६ संशयितांना खोपोली (महाराष्ट्र) येथील पोलिसांनी कह्यात घेतले !
म्हापसा, ४ मे (वार्ता.) – येथील श्री देव बोडगेश्वर मंदिरातील चोरी प्रकरणातील चारही संशयित चोरांना खोपोली (महाराष्ट्र) पोलिसांनी कह्यात घेऊन गोव्यासह महाराष्ट्रातील काही चोर्यांचा छडा लावला आहे. राजू फरत शेख (वय २७ वर्षे, कोलकाता आणि मूळचा बांगलादेशी), इम्रान शहीद शेख (वय २४ वर्षे, सुरत, गुजरात), राकीब कुलमहंमद शेख (वय २८ वर्षे, सुरत, गुजरात) आणि मुजाहिद गुलजार खान (वय २८ वर्षे, पुणे आणि मूळचा झारखंड) ही संशयित चोरांची नावे आहेत. संशयितांकडून ७ लाख रुपये रोख रक्कम, ३ भ्रमणभाष संच आणि अन्य साहित्य कह्यात घेण्यात आले आहे.
अन्वेषणाच्या वेळी संशयितांनी म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिरासह खोपोली येथील श्री बहिरी देव मंदिर, शीलफाटा खोपोली येथील श्री हनुमान मंदिरासह रायगड, पनवेल, सावंतवाडी आणि गोवा येथे चोरी केल्याचे मान्य केले आहे. संशयित ४ वर्षांपूर्वी सीबीडी, बेलापूर येथे वास्तव्यास होते.
मंदिरातील चोरीचे सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रीकरण झाले होते. अन्वेषणाच्या वेळी चोर पत्रादेवीमार्गे सावंतवाडीच्या दिशेने गेल्याचे दिसले होते. त्यानुसार गोवा पोलिसांनी महराष्ट्र पोलिसांना माहिती दिली. महाराष्ट्र पोलीस चोरांच्या मागावर होते. पोलिसांनी ३० एप्रिल या दिवशीच चोरांच्या मुसक्या आवळल्या. संशयित राजू शेख याने त्याच्या वाट्याला आलेल्या रकमेपैकी १ लाख ३३ सहस्र रुपये बांगलादेशमधील एका नातेवाइकाच्या अधिकोषात वर्ग केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. श्री देव बोडगेश्वर मंदिरात २९ एप्रिल २०२४ या दिवशी चारही संशयितांनी सुरक्षारक्षक दशरथ ठाकूर यांना खुर्चीला बांधून २ अर्पण पेट्या फोडल्या होत्या आणि ३ गोण्या पिशव्या भरून सुमारे १० ते १२ लाख रुपये रोख रक्कम पळवली होती. खोपोली पोलिसांनी संशयितांना कह्यात घेतल्याची माहिती म्हापसा पोलिसांना दिली.
पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिरात चोरी
म्हापसा – येथील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर मंदिरात २९ एप्रिल या दिवशी चोरी झाली. या मंदिरात यापूर्वी २८ फेब्रुवारी २०२४ या दिवशीही चोरी झाली होती. या वेळी चोरट्यांनी पादुका पेटीवर डल्ला मारला होता; मात्र पोलिसांनी तात्काळ अन्वेषण करून मूळ कर्नाटकमधील संशयित आनंद नाईक आणि सागर शिंदे यांना कह्यात घेतले होते. सध्या हे दोघेही चोरटे कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या चोरीच्या घटनेनंतर म्हापसा पोलिसांनी श्री देव बोडगेश्वर मंदिरासमवेत म्हापसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंदिरांना प्रत्येक ८ दिवसांनी दानपेटीतील पैसे काढून ती रिकामे करणे आणि दानपेटीला हात लावताच गजर होईल, अशी यंत्रणा बसवण्याची सूचना केली होती; मात्र या सूचनेकडे देवस्थान समितीने दुर्लक्ष केले. यामुळे २९ एप्रिल या दिवशी चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागली.
संपादकीय भूमिका
|