सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेल्या सूक्ष्मातील प्रयोगाच्या वेळी साधिकांना जाणवलेली सूत्रे
एका भावसत्संगामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना सूक्ष्मातील प्रयोग करायला सांगितले. त्या प्रयोगांच्या वेळी भावसत्संगाला उपस्थित साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
अ. कु. वैदेही राजेंद्र शिंदे (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची कन्या), फोंडा, गोवा.
१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी हात हवेत फिरवणे
‘सद्गुरु राजेंद्र शिंदे सर्व साधकांकडे पहात हात फिरवत असतांना आम्हा साधकांना ‘स्वत:चा उजवा हात वर करून डोळे बंद करून काय अनुभवता येते ?’, ते पहायला सांगितले. हा प्रयोग चालू झाल्यावर माझा हात सूक्ष्मातून घड्याळ्याच्या दिशेने आपोआप गोलाकार फिरायला लागला आणि हळूहळू त्याचा वेग वाढत गेला. माझ्या तळहाताला थंड लहरी जाणवत होत्या.
२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पंख्याच्या एका पात्याकडे बघणे मला पंख्याचे पाते पुढे-मागे हलतांना दिसले.
३. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पंख्याकडे हात दाखवून केलेले प्रयोग
३ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पंख्याच्या एका पात्याकडे हात दाखवणे : हे बघत असतांना मला पात्याची कडा ही वरच्या दिशेने वळल्याप्रमाणे जाणवली.
३ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पंखा १ च्या गतीने फिरतांना हात दाखवणे : तेव्हा पंख्याच्या मधल्या गोलाकार भागाची गती सूक्ष्मातून न्यून आणि पात्यांची गती अधिक जाणवत होती.
४. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पंख्याच्या एका पात्याकडे चरण दाखवणे
तेव्हा मला पंख्याच्या पात्याची कडा सूक्ष्मातून गोलाकार झाल्यासारखी जाणवली आणि त्या क्षणी माझी भावजागृती झाली.
४ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पंखा १ च्या गतीने फिरतांना पंख्याच्या दिशेने चरण करणे : सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पंख्याच्या दिशेने चरण ठेवताक्षणी पंख्याची गती बरीच न्यून झाली. पंख्याचा मधला गोलाकार भाग आणि पाती हे वेगळे भाग असल्यासारखे मला जाणवले. ‘या प्रयोगातून चरणांतून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होते’, असे मला जाणवले.
५. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पंखा १ च्या गतीने फिरतांना पंख्याकडे पहाणे
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पंख्याकडे बघताक्षणी ‘पंख्याला सूक्ष्मातून एक झटका बसला’, असे मला जाणवले. तेव्हा मला पंख्याची गती वाढल्यासारखी वाटली.
६. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या हाताचा प्रयोग
सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या हाताचे मधले बोट आणि अंगठा यांतून धूर बाहेर येतांना जाणवला. मधले बोट हे तेजतत्त्व आणि अंगठा हे आकाशतत्त्वाशी संबंधित आहे. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज जाणवत होते.
हे गुरुमाऊली, आपल्या कृपाशीर्वादामुळे मला सूक्ष्म स्तराचा अभ्यास करता आला. देव सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. त्यामुळे भगवंताच्या चरणी जाण्यासाठी माझी गुरुमाऊली मला सूक्ष्म अभ्यास शिकवत आहे, याबद्दल तिच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
आ. सौ. मनाली भाटकर, फोंडा, गोवा.
१. पंखा १ च्या गतीने फिरतांना त्याच्याकडे हात करणे
त्यांनी पंख्याच्या दिशेने हात केल्यावर ‘पंख्याची गती सूक्ष्मातून आणखी न्यून झाली आहे’, असे मला जाणवले.’
२. पंखा १ च्या गतीने फिरतांना पंख्याकडे पहाणे
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी चालू असलेल्या पंख्याकडे पाहिल्यावर ‘पंख्याची गती न्यून न करताही ती न्यून झाली आहे’, असे जाणवले.
३. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी हात हवेत फिरवणे
सद्गुरु राजेंद्र शिंदे सर्व साधकांकडे पहात हात फिरवत असतांना आम्हा साधकांना ‘स्वत:चा उजवा हात वर करून डोळे बंद करून काय अनुभवता येते ?’, ते पहायला सांगितले. तेव्हा आरंभी माझ्या हाताच्या तळव्याला सूक्ष्मातून झिणझिण्या आल्या आणि नंतर मला गारवा जाणवला.
इ. श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पंख्याच्या एका पात्याकडे हात दाखवणे
सद्गुरु राजेंद्रदादा यांनी त्यांचा उजवा हात पंख्याच्या दिशेने केल्यावर मला पंख्यांच्या पात्यांमध्ये स्पंदने जाणवली. काही वेळ मला पंख्याची पाती हलल्यासारखी वाटली. ही वायुतत्त्वाची अनुभूती असल्याचे माझ्या लक्षात आले.
२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी हवेत हात फिरवणे
सद्गुरु राजेंद्र शिंदे सर्व साधकांकडे पहात उजवा हात हवेत फिरवत असतांना आम्हा साधकांना ‘स्वत:चा उजवा हात वर करून डोळे बंद करून काय अनुभवता येते ?’, ते पहायला सांगितले. तेव्हा मला माझ्या बोटांमधून हातात लहरी जात आहेत, असे जाणवले. मला माझा हात हलका वाटून थंडपणा जाणवला. इतर वेळी मी माझ्या शारीरिक व्याधीमुळे हात वर केला असता तो दुखतो; परंतु या वेळी मी हात वर करू शकले आणि माझा हात दुखला नाही.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २.९.२०२३)
|