साधकाचा स्वयंशिस्तीपासून मोक्षापर्यंतचा प्रवास
सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर (वय ८४ वर्षे) यांचे अनमोल विचारधन !
‘साधकाच्या जीवनात स्वयंशिस्त असणे अनिवार्य आहे. स्वयंशिस्त अंगीकारलेल्या साधकामध्ये ‘स्वच्छतेची आवड, टापटीपपणा आणि नीटनेटकेपणा’ या गुणांचा विकास होतो. यांमुळे साधकाभोवती आणि त्याने केलेल्या कृतीतून सत्त्वगुणांची स्पंदने अनुभवता येऊ लागतात. जेथे सत्त्वगुण आहे, तेथे पावित्र्य अनुभवता येते. तेथूनच चैतन्याचा उगम होतो आणि चैतन्याची अनुभूती आपोआप येते. साधकाच्या साधनेने साधकामधील चैतन्यात हळूहळू वाढ होऊ लागली की, त्याला आनंद मिळू लागतो. त्याला आनंद मिळत असतांना त्याला हळूहळू शांतीची अनुभूती येऊ लागते. नंतर तो प्रीतीच्या टप्प्याला पोचतो. या सर्वांमुळे त्याच्यातील प्रीती वृद्धींगत होते आणि त्याला मोक्षापर्यंत जाण्यासाठी ईश्वराकडून बळ मिळते.’
– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.