उतारवयातही तळमळीने अध्यात्मप्रचाराची सेवा करणार्या नागपूर येथील सौ. नीलिमा सप्तर्षी (वय ८६ वर्षे) !
‘नागपूर येथे एक ज्येष्ठ नागरिकांचे निवासस्थान आहे. ८.३.२०२४ या दिवशी त्यांच्या संस्थेच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय महिलादिन’ साजरा करण्यात आला. मला तेथे साधनेविषयीच्या प्रवचनांच्या माध्यमातून तेथील महिलांना साधनेचे महत्त्व सांगण्याची संधी मिळाली. त्यांतील काही जणी ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांच्या वर्गणीदार झाल्या. काही महिलांनी सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ घेतले. गुरुकृपेमुळेच माझ्याकडून ही सेवा झाली.
या वेळी आयोजित करण्यात आलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत मला प्रथम पारितोषिक मिळाले.’
– सौ. नीलिमा सप्तर्षी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८६ वर्षे), नागपूर (१२.३.२०२४)