परभणी येथे मुलीने आतंरजातीय विवाह करू नये, यासाठी पालकांकडून मुलीची हत्या

परभणी – जिल्ह्यातील पालम तालुक्यामधील नाव्हा या गावातील एका १९ वर्षीय मुलीने तिच्या आंतरजातीय प्रियकराशी प्रेमविवाह करण्याचा निश्‍चय केला; मात्र या प्रेमविवाहाला पालकांचा विरोध होता. त्यामुळे २१ एप्रिल या दिवशी रात्री पालकांनी पोटच्या मुलीला ठार मारल आणि नंतर तिचा मृतदेह नाव्हा येथील स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट केला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकूण ८ जणांविरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट करणे या कलमांखाली ३ मे या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला.