मुलाचे निधन झाल्यामुळे मी धार्मिक मूर्ती घराबाहेर फेकून घरातील देवघर बंद केले ! – अभिनेते शेखर सुमन
मुंबई – मुलाचे निधन झाल्यावर घरातील सर्व धार्मिक मूर्ती बाहेर फेकल्या आणि घरातील देवघर बंद केले, असे अभिनेते शेखर सुमन यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. ‘मी म्हणायचो देवाने मला एवढे दुःख दिले की, माझ्या सुंदर आणि निरागस मुलाचा जीव घेतला. मी देवाकडे कधीच जाणार नाही. मुलगा आजारातून बरा होण्यासाठी आम्ही प्रार्थना करायचो’, असेही सुमन यांनी या वेळी सांगितले.
वर्ष १९८९ चा किस्सा सांगतांना त्यांनी सांगितले की त्यांच्या ११ वर्षांच्या मुलाला बरा न होणारा दुर्मिळ आजार झाल्याने आधुनिक वैद्यांनी ‘तो आणखी ८ मास जगेल’, असे सांगितले होते. यानंतर शेखर सुमन यांनी जगभरातील अनेक आधुनिक वैद्यांचे उपचार घेतले. त्यानंतर तो मुलगा ४ वर्षे जगला. एके दिवशी आजारी असतांना मुलाने शेखर सुमन यांना चित्रीकरणासाठी जावू नये, असे सांगितले; परंतु दिग्दर्शकाने शेखर सुमन यांची पुष्कळ हानी होईल, असे सांगितल्याने सुमन हे चित्रीकरणासाठी गेले आणि त्याच वेळी त्यांच्या मुलाचा अंत झाला. मुलाच्या निधनाची घटना झाल्यानंतर त्यांनी वरील कृत्य केल्याचे माध्यमांना सांगितले. मुलगा बरा होण्यासाठी ते बौद्ध धर्माकडे वळल्याचेही त्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाअध्यात्मशास्त्रानुसार जन्म, मृत्यू या घटना व्यक्तीच्या पूर्णत: प्रारब्धानुसार घडत असतत. त्यामुळे अशा घटनांमुळे देवावरचा विश्वास उडून देवाला दोष देणे हे अज्ञानाचे लक्षण ! |