Congress Candidate Slaps Woman: ‘कमळालाच मत देणार’, असे म्हणणार्या कामगार महिलेला काँग्रेसच्या उमेदवाराने मारली चापट !
इंदूर (तेलंगाणा) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंदूर (निजामाबाद) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार तातिपर्थी जीवन रेड्डी यांनी येथील एका महिलेला चापट मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या महिलेने लोकसभा निवडणुकीत कमळालाच मतदान करणार असल्याचे सांगितल्यावर रेड्डी यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी महिलेला चापट मारली.
ही घटना अरमुर विधानसभा मतदारसंघातील एका गावात उघडकीस आली, जिथे रेड्डी हे इतर नेत्यांसमवेत प्रचार करत होते. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या महिलेने काँग्रेसला मतदान केल्याचे सांगण्यात येत आहे. आता निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. त्या वेळी वरील घटना घडली. निवडणुकीसाठी काँग्रेसने रेड्डी यांना भाजपचे विद्यमान खासदार धर्मपुरी अरविंद यांच्या विरोधात उभे केले आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसचा महिलाविरोधी आणि जनताद्रोही चेहरा जाणा ! |