Nijjar Murder Case : (म्हणे) ‘भारतानेच हरदीप सिंह निज्जरची हत्या केली !’ – कॅनडाचे नेते जगमीत सिंह
कॅनडाचे नेते जगमीत सिंह यांचा भारतावर गंभीर आरोप !
ओटावा – हरदीप सिंह निज्जरची हत्या भारतानेच केल्याचा आरोप कॅनडाचे नेते जगमीत सिंह यांनी केला. त्यांनी यापूर्वीही भारतावर आरोप केले आहेत. एकीकडे सिंह हे भारतावर गंभीर आरोप करत आहेत, तर दुसरीकडे निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा कुठलाही पुरावा कॅनडाच्या पोलिसांना अद्याप सादर करता आलेला नाही.
जगमीत सिंह हे कॅनडातील ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’ या पक्षाचे नेते आहेत. सिंह यांच्या पक्षाची पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या पक्षाशी युती आहे. गेल्या वर्षी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप मूर्खपणाचे असल्याचे म्हटले होते.
संपादकीय भूमिका‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या वृत्तीचे कॅनडाचे नेते ! |