हुपरीतील धार्मिक स्थळाला देण्यात आलेल्या अवैध नळजोडणीच्या संदर्भात योग्य ती कृती करा ! – साहाय्यक आयुक्त, कोल्हापूर

हुपरी – हुपरी नगर परिषदेच्या गट क्रमांक ८४४/अ/१ मधील धार्मिक असलेल्या मालमत्ता क्रमांक ४४८९ ला अवैध रितीने नळजोडणी देण्यात आली होती. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. (अवैध गोष्टीवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना पत्रव्यवहार का करावा लागतो ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक) याची नोंद घेत कोल्हापूर येथील साहाय्यक आयुक्त देवानंद ढोकळे यांनी हुपरी येथील मुख्याधिकारी यांना या अवैध जोडणीच्या संदर्भात योग्य कार्यवाही करून नितीन काकडे यांना कळवण्यात यावे, असे पत्र पाठवले आहे.