‘आर्य बाहेरून आले म्हणणे’, ही एक राष्ट्रद्रोही मान्यता !
लोकसभेत ‘संविधान दिवसा’च्या प्रसंगी चर्चा करतांना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘‘आर्यांनी भारतावर आक्रमण करून आपल्याला दलित आणि शोषित बनवले आहे. मागील ५ सहस्र वर्षांपासून आम्ही आपले अत्याचार सहन करत आहोत. आम्ही तुम्हाला विरोध करत रहाणार.’’ खर्गे यांनी ‘या देशात बाहेरून येऊन राज्य करणारा भाजप पक्ष आहे’, असेही म्हटले. याचे गांभीर्य लक्षात घेऊन संसद सदस्य स्वामी सुमेधानंद यांनी श्री. खर्गे यांच्या बोलण्याला लिखित स्वरूपात विरोध केला आणि कार्यवाहीतून त्यांना बाहेर काढले. काही वर्षांपूर्वी अँग्लो इंडियन राज्यसभा सदस्य श्री. फ्रँक अँथनी यांनी संसदेत म्हटले होते, ‘भारतीय लोकांनी इंग्रजी भाषेचा द्वेष करू नये; कारण संस्कृत सुद्धा भारतियांसाठी विदेशी भाषा आहे. ही भारतात बाहेरून आलेल्या आर्य लोकांची भाषा आहे.’ बाहेरून येऊन भारतात स्थायिक होण्याच्या आर्यांच्या विचारामागे इंग्रजी लोकांचा हात आहे. भारतावर आक्रमण करून मुसलमानांनी येथील सभ्यता आणि संस्कृती बळजोरीने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी या देशाला गुलाम बनवले आणि बुद्धीच्या जोरावर येथील सभ्यता अन् संस्कृती नष्ट करण्याची योजना बनवून कार्य केले. मल्लिकार्जुन खर्गे याच षड्यंत्राचे शिकार आहेत.
१. आर्य-द्रविड वाद म्हणजे देशविरोधकांचा देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न
इंग्रज आजही आपल्या देशाचे तुकडे करण्याच्या प्रयत्न करत आहेत. प्रामुख्याने इस्लाम आणि ख्रिस्ती यांच्या माध्यमातून धर्मांतर अन् माओवादी हिंसेचा प्रसार करून देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यापार आणि आधुनिकता यांच्या नावावर समाजात नैतिक अन् सांस्कृतिक मूल्यांचा नाश करण्यासाठी उपाय योजले आणि भारतात आर्य-द्रविड यांच्यातील संघर्षाचा काल्पनिक सिद्धांत पसरवला. याचा उपयोग करून पाश्चात्त्य युरोप-अमेरिका यांची शक्ती, हिंसा, असंतोष पसरवून परत ख्रिस्तीस्तान, इस्लामीस्तान, द्रविडस्तान आणि माओवाद यांच्या नावावर नक्षलवाद्यांच्या राज्याच्या रूपात या देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न ते त्यांची संपूर्ण शक्ती लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
२. आर्य आणि द्रविड यांच्या वादात ‘आदिवासी’ शब्दाचा वापर करणे चुकीचे
खर्गे यांनी जे म्हटले, त्याला स्वातंत्र्य मिळाले, त्याच वेळी पाठ्यपुस्तकांमध्ये संपवले जाणे आवश्यक होते. आपल्या शासनात ‘आदिवासी’ यांसारख्या शब्दांचा प्रयोग गेला जातो. या शब्दाचा अर्थ आजपर्यंत आपल्या लक्षात आलेला नाही; कारण आपली मुले आजही हेच अभ्यासतात, ‘या देशात आर्य लोक बाहेरून आले आणि येथील मूळ रहिवासी (आदिवासी) द्रविड लोकांचा पराजय करून त्यांना दक्षिणेत पळवून लावून स्वत:चे राज्य स्थापन केले.’ या चुकीच्या गोष्टीचा इतका प्रचार केला गेला की, भारतीय संसदेतील काँग्रेसचे नेते खर्गे यासाठी ‘एक प्रवक्ता’ म्हणून उभे रहाण्यात स्वत:चा गौरव समजू लागले आणि स्वत:ला द्रविड अन् आर्य यांच्यापासून वेगळे असल्याचे मानू लागले. ‘आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर या मान्यतेवर बहिष्कार घालू शकतो’, अशी संधी आज आपल्याकडे चालून आली आहे आणि प्रशासनिक शब्दांतून ‘आदिवासी’ यांसारख्या शब्दांचा प्रयोग करणे यांवर निषेध केला पाहिजे. खर्गे जर आर्यांपेक्षा वेगळे असते, तर त्यांचे नाव मल्लिकार्जुन नसते, जर ते भाजपला विदेशी पक्ष मानत असतील, तर ज्यांचे ते सेनापती बनले आहेत, अशा श्रीमती सोनिया गांधी यांना ते काय म्हणतील ?
३. आर्य-अनार्य सिद्धांत हा केवळ भारतीय समाजात फूट पाडण्यासाठीच !
आर्य-अनार्य हे शब्द जातीवाचक नसून गुणवाचक आहेत; कारण वेद म्हणतात, ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ (संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) बनवू.) आर्य-अनार्य शब्द चांगले आणि वाईट या अर्थी आहेत. ‘अनार्य याचा अपभ्रंश अनाडी, म्हणजे समज नसलेला’, असा आहे, हा शब्द याच अर्थाने वापरला जातो. चोर, डाकू, दरोडेखोर यांची काही जात असते का ? भारतीय संस्कृती, साहित्य, परंपरा यांमुळे लोक अत्युच्च परंपरेचे धनी आहेत. ‘वेद आणि वैदिक धर्माचा जे स्वीकार करतात, ते सर्व आर्य’ आहेत. कुणीही आर्य बनू शकतात किंवा कुणाला आर्य म्हणावे. आपल्या आर्य परंपरेत एक पत्नी आपल्या पतीला ‘आर्यपुत्र’ म्हणते. ‘आर्य-अनार्य सिद्धांत ही केवळ कल्पना आहे, ज्याचा उद्देश भारतीय समाजात फूट पाडणे’, हा होता. हा सिद्धांत विद्वान, वैज्ञानिक यांच्या दृष्टीने खंडित झाला आहे.
महर्षि दयानंद यांच्या मते ‘आर्य बाहेरून भारतात आले, याचा पुरातन भारतीय साहित्यातील कोणत्याही ग्रंथात उल्लेख सापडत नाही. जर आर्य बाहेरून भारतात येऊन स्थायिक झाले असते, तर इतक्या मोठ्या गोष्टीचा ऐतिहासिक संदर्भाचा उल्लेख साहित्यात न सापडणे, हे केवळ अशक्य आहे. आर्यांची एखादी परंपरा मध्य आशिया किंवा अन्य देशात सापडते का ? आर्यांची भाषा त्याच्या वास्तविक रूपात कोणत्या दुसर्या देशात बोलली जाते किंवा इतिहासात शिकवली जाते का ? इतकेच नाही, इतक्या मोठ्या जातीचा संसर्ग एक दिवसात तर होऊ शकत नाही. त्यांच्या इकडे येण्याच्या मार्गावर त्यांची चिन्हे, अवशेष तर मिळाले पाहिजेत. जर आर्य बाहेरून आले असतील, तर त्यांनी भारतावर विजयश्री मिळवली होती का ? आणि तसे असेल, तर मधले देश त्यांनी न जिंकता तसेच सोडले का ? जर जिंकले असतील, तर आज त्या ठिकाणी त्यांचे राज्य का नाही ? आर्यांचा इतिहास, संस्कृती यांचे अवशेष त्या ठिकाणी का सापडत नाहीत ?’
४. मूळ रहिवाशांना बाहेर काढून त्यांचे राज्य बळकावण्यासाठी आर्य कल्पना !
जगातील साहित्यात आर्य बाहेरून भारतात आल्याचा उल्लेख सापडत नाही; परंतु अनेक ग्रंथांत त्यांचा जुना इतिहास सापडतो ज्यात त्यांचे पूर्वज भारतातून इराण येथे जाऊन राहिल्याचा उल्लेख सापडतो. शिलालेख, ताम्रलेख, स्तूप, स्तंभ, भवन, स्मारक इत्यादींमध्ये संपूर्ण भारतात या प्रकारचा कोणताही उल्लेख सापडत नाही किंवा कोणते चिन्हसुद्धा मिळत नाही. मध्य आशिया किंवा इतर देशांतून भारतात येऊन स्थायिक होण्याची आणि येथील मूळ रहिवाशांना बाहेर काढून त्यांचे राज्य बळकावण्याची आर्यांची कल्पना होती, हे एक केवळ खोटे षड्यंत्र आहे. ज्यांना आपण द्रविड, दलित, शुद्र मानत आहोत त्यांचे गोत्र, परंपरा, खाण्या-पिण्याच्या सवयी, वस्त्र, दागिने, पोषाख हे सर्व आर्यांप्रमाणेच आहे. सर्वजण राम, हनुमान, शिव, गणेश इत्यादी देवतांची पूजा आणि उपासना करतात. व्रत, उपवास, संस्कार सर्वकाही एक दुसर्यांप्रमाणेच आहे. अंतिमत: समाज एकच आहे. जर त्यात काही फरक असेल, तर तो विद्या किंवा अविद्या आणि गरीब किंवा श्रीमंत याचा आहे. हे सर्व समाजात स्वाभाविकपणे पहायला मिळते. धन आणि प्रतिष्ठा यांचा लोभ असणार्या लोकांनी इंग्रजांच्या इच्छेनुसार या गोष्टीचे लेखन केले, ज्याचा श्रेष्ठ विद्वान लोकांनी निषेध केला.
५. भारतीय समाजात फूट पाडण्यासाठी ‘बामसेफ’ची स्थापना
भारतीय समाजात श्रेष्ठ कर्म करण्याच्या वेळी केल्या जाणार्या संकल्पाचा उल्लेख केला आहे -‘आर्यावर्ते जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे’, म्हणजेच या देशाचे नाव ‘आर्यावर्त’ असेच होते. ‘आर्यावर्त’ किंवा ‘ब्रह्मवर्त’ याआधी कोणत्याही नावाची चर्चा जगाच्या इतिहासात सापडत नाही. अमेरिका, युरोप येथील ख्रिस्ती समाज आर्य-द्रविड यांच्या सिद्धांताला मजबूती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात धन उपलब्ध करून देतो. हे कार्य करणारी संघटना भारतात ‘बामसेफ’ या नावाने असून ती हिंदु समाजाला वेगळे करण्याचा प्रयत्न करते. दलित प्रकाशनाच्या नावावर इंग्रजांनी साहित्य प्रकाशित केले आहे. झाशीची राणी, महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वातंत्र्यसंग्राम, म्हणजे सवर्णियांनी स्वत:च्या अधिकारासाठी केलेली लढाई होती. बामसेफच्या साहित्यात महर्षि दयानंद, स्वामी श्रद्धानंद किंवा अन्य संस्थेद्वारे केलेल्या समाज सुधारणांची चर्चा वाचायला मिळत नाही. बामसेफची निर्मिती बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम आणि डी.के. खापडे यांनी अमेरिकेच्या साहाय्यातून केली होती. याचा उद्देश ‘आरक्षणाचा लाभ घेऊन भारतीय समाजात सवर्ण-अवर्ण यांच्यातील दरी वाढवणे आणि समाजात फूट पाडण्यासाठी प्रयत्न करणे’, हा होता. सध्या खर्गे यांनी संसदेत सांगितलेला आर्य-अनार्य हा विचार समाजात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. समाज आणि सरकार यांना यावर उपाययोजना करण्यासाठी कार्यशील झाले पाहिजे.
– दिवंगत प्रा. धर्मवीर
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’, जानेवारी २०२४)
संपादकीय भूमिकाभारतीय ग्रंथात आर्यांविषयी चुकीचा उल्लेख नसतांना त्याविषयी खोटी माहिती पसरवणार्यांच्या विरोधात सरकारने कारवाई करावी ! |