सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या अनुभूती
वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण ३ मे या दिवशी पाहिल्या. आज उर्वरित अनुभूती पाहूया.
याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/790112.html
७. श्रीमती शालिनी गुल्हाने (वय ६६ वर्षे)
७ अ. ब्रह्मोत्सवाचा अद्वितीय कार्यक्रम पहातांना पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य जाणवणे : ‘११.५.२०२३ या दिवशी प.पू. गुरुदेवांच्या ८१ व्या जन्माेत्सवानिमित्त कार्यक्रम असल्याचे कळल्यावर ‘मला गुरुदेवांचे चैतन्य मिळणार’, या विचाराने अतिशय आनंद होऊन माझे मन भरून आले. तो अद्वितीय सोहळा पहातांना मला पुष्कळ आनंद आणि चैतन्य जाणवत होते. मला शारीरिक त्रास असतांनाही गुरुमाऊलीच्या कृपेने मी सभागृहात एवढा वेळ बसू शकले. माझ्यासाठी ही मोठी अनुभूती आहे. ‘गुरुदेवांच्या कृपेने मी हे लिहू शकले’, यासाठी गुरुचरणी कृतज्ञता !’
८. सौ. स्मिता ठाकरे
८ अ. ब्रह्मोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने आलेले साधक पाहून आनंद होणे : ‘११.५.२०२३ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम होता. कार्यक्रमस्थळी येताच मला वातावरणांत शांतता आणि प्रसन्नता जाणवत होती. माझा नामजप आपोआप चालू झाला. ब्रह्मोत्सवानिमित्त गोवा येथे इतक्या बहुसंख्येने आलेल्या सर्व साधकांना पाहून माझ्या अंगावर आनंदाने रोमांच आले.’
९. श्री. प्रदीप गर्गे (वय ६४ वर्षे)
९ अ. ब्रह्मोत्सवामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे व्यंकटेशरूपात दर्शन होणे : ‘११.५.२०२३ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या ब्रह्मोत्सवाच्या सोहळ्यात मला गुरुमाऊलींचे रथारूढ व्यंकटेशरूपाचे दर्शन झाले. तेव्हापासून संपूर्ण सोहळा संपेपर्यंत मी भावावस्थेत होतो.’
१०. सौ. वनिता शेंद्रे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे)
१० अ. ब्रह्मोत्सवाला उपस्थित रहाता येणार नसल्यामुळे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर प्रार्थना त्यांच्या चरणी पोचत आहेत’, असे जाणवणे : ‘११.५.२०२३ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त विशेष सोहळा आहे’, असे मला कळले. ‘काही घरगुती कारणामुळे मी हा सोहळा पाहू शकणार नाही’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा श्रीकृष्ण मला प्रार्थना सुचवत होता. ‘त्या प्रार्थना गुरुदेवांच्या चरणी पोचत आहेत’, असे मला जाणवत होते.’
११. सौ. नलिनी ठाकरे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६१ वर्षे)
११ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दर्शनाने ‘जीवन धन्य झाले’, असे वाटणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आहे’, हे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. ‘गुरुमाऊली कुठल्या रूपात दर्शन देणार’, याची माझ्या मनाला पुष्कळ ओढ लागली होती. कार्यक्रम बघतांना ‘मी द्वापरयुगात असून प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर गुरुदेवांचा रथ उभा आहे’, असे मला वाटत होते. गुरुमाऊली सर्वांना ‘श्रीहरि’च्या रूपात दर्शन देत होती. गुरुमाऊलीला बघून सतत भावाश्रू येत होते. ही भावावस्था सतत २ दिवस टिकून होती. अजूनही गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे दर्शन आठवून माझी भावजागृती होते. माझे ‘जीवन धन्य-धन्य झाले’, असे मला वाटत आहे. मला ‘गुरुदेवांच्या कृपेनेच हे सर्व अनुभवता आले’, यासाठी गुरुचरणी कृतज्ञता !’ (समाप्त)
(सर्व सूत्रांचा दिनांक १३.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |