Mumbai School Principal Case : मुंबई – हमासचे समर्थन केल्यावरून त्यागपत्र देण्याचा आदेश  मुख्याध्यापिकेने फेटाळला !

परवीन शेख या मुख्याध्यापिकेचा शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात पवित्रा !

सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख

मुंबई – येथील सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी ‘एक्स’वर हमास-इस्रायल संघर्षासंदर्भात हमासविषयी सहानुभूती दाखवणार्‍या पोस्टला ‘लाईक’ करून त्यावर ‘कॉमेंट’ केले होते. या कारणास्तव शाळा व्यवस्थापनाने त्यांना त्यागपत्र देण्यास सांगितले आहे; परंतु त्यांनी त्यागपत्र देण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘‘त्यागपत्र देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे. मी लोकशाही असलेल्या भारतात रहात असून मला बोलण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. (अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे आतंकवाद्यांची बाजू घेणे नव्हे ! – संपादक) सोमय्या शाळेच्या कर्मचार्‍यांनी सार्वजनिकपणे राजकीय विषयांवर टिप्पणी करू नये, असे कोणताही धोरण नाही. मार्च महिन्यात झालेल्या एका बैठकीत कर्मचार्‍यांना सामाजिक माध्यमांवर त्यांचे विचार मांडण्याची अनुमती असल्याचे सांगण्यात आले होते. मी या शाळेच्या विकासासाठी १०० टक्के प्रयत्न केले.’’

परवीन शेख या मागील १२ वर्षांपासून या शाळेत काम करत असून गेल्या ७ वर्षांपासून शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. ‘द इंडियन एक्सप्रेस’ आणि अन्य एक संकेतस्थळ येथे हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर शाळेने त्यांना त्यागपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी ‘हा निर्णय आमच्यासाठी कठीण असल्याचे’ही शाळा व्यवस्थापनाने सांगितले.

संपादकीय भूमिका

  • आतंकवाद्यांची बाजू घेणार्‍या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कुठले संस्कार करणार ? त्याविषयी शाळेने त्यागपत्र देण्यास सांगूनही नकार देणार्‍या धर्मांध मुख्याध्यापिकेचा उद्दामपणा जाणा !
  • भारतातील सुशिक्षित मुसलमान महिला या आतंकवाद्यांना थेट उघडपणे सहानुभूती दर्शवतात आणि वरून त्यांच्यावरील कारवाईविषयी आकांडतांडव करतात, हे लक्षात घ्या !