बरेली (उत्तरप्रदेश) येथे शाळेतील लापशीमुळे १४ विद्यार्थ्यांना विषबाधा !
स्वयंपाक करणार्या महिलेला अनेक वेळा सांगूनही स्वच्छतेची काळजी घेतली नसल्याचा आरोप !
बरेली (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील बिथरी चैनपूर या गावात असलेल्या कस्तुरबा शाळेत दिलेल्या लापशीमुळे १४ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. आजारी मुलांना तातडीने बिथरी आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. मुलांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांना बरेच दिवस खराब झालेले अन्न मिळत होते.
१ मेच्या सायंकाळी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणात कच्च्या पोळ्या आणि कच्चा भात आढळून आला. त्यानंतर २ मेच्या सकाळी मिळालेली लापशीही चांगली नव्हती. ती खाल्ल्याने मुले आजारी पडली. यासंदर्भात वॉर्डन अनिता यांनी सांगितले की, स्वयंपाक करणारी महिला स्वच्छतेची काळजी घेत नाही. तिला अनेकदा सांगितले आहे.
संपादकीय भूमिका
|