India Slam Pakistan : भारतावर बोलणार्या पाकचा संपूर्ण इतिहास संशयास्पद !
संयुक्त राष्ट्रांत पुन्हा एकदा भारताने पाकला फटकारले !
न्यूयॉर्क (अमेरिका) – सर्व बाबतीत पाकिस्तानचा इतिहास सर्वांत संशयास्पद आहे, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर टीका केली. संयुक्त राष्ट्र महासभेतील पाकिस्तानी प्रतिनिधीने भारताविरोधात वक्तव्य केले होते. त्याने श्रीराममंदिर आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यांवर विधाने केली होती. त्यावर भारताने हे प्रत्युत्तर दिले.
संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या की,
१. जगातील कठीण काळात आम्ही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे विधान शिष्टाचाराच्या विरोधात आहे. त्यांचा स्वभाव आमच्या प्रयत्नांना धोका निर्माण करू शकतो.
२. भारत हे केवळ हिंदु, बौद्ध, जैन आणि शीख धर्मांचे जन्मस्थान नाही, तर ते इस्लाम, ख्रिस्ती, ज्यू अन् पारशी धर्मांचेही गड आहे. बर्याच काळापासून त्या धर्माचे लोक येथे आश्रय घेत आहेत. जग भारताच्या विविधतेचा हा सर्वांत मोठा पुरावा आहे.
३. पाकिस्तानने मुत्सद्देगिरीच्या मूल्यांचे पालन करण्याची आम्ही अपेक्षा करतो. प्रत्येक विषयात सर्वांत संशयास्पद इतिहास असलेल्या देशाकडून अशी अपेक्षा करणेही चुकीचे आहे ?
४. आतंकवाद हा शांतता आणि सर्व धार्मिक मूल्ये यांच्या विरोधात आहे. तो विसंवाद निर्माण करतो, शत्रुत्वाला प्रोत्साहन देतो आणि धार्मिक मूल्ये कमकुवत करतो. भारताचा असा विश्वास आहे की, सर्व देशांनी शांततेच्या भावनेचा पाठपुरावा करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. याची आवश्यकता आहे.
संपादकीय भूमिकापाकला भारताने अनेकदा संयुक्त राष्ट्रे आणि अन्य जागतिक व्यासपिठांवर फटकारले असले, तरी तो निर्लज्जपणे परत परत भारताच्या विरोधात बोलण्याचे थांबवत नाही. पाक सारख्याला शब्दांच्या नाही, तर त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर देणे आवश्यक आहे ! |