शिक्षकांना विचारा की, तुम्हाला शाळा भारतात चालवायची आहे कि वेस्ट इंडिजमध्ये ? – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची चेतावणी
इंदूर (मध्यप्रदेश) येथील शाळेत हिंदु विद्यार्थांना टिळा लावण्यास बंदी !
इंदूर (मध्यप्रदेश) – येथे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा दरबार चालू असतांना एका महिलेने येऊन एका शाळेमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास आणि मनगटावर दोरा बांधण्यास दिले जात नाही, अशी तक्रार केली. यावर ‘भारतात प्रत्येकाला त्यांचा धर्म आचरणात आणण्याचा अधिकार आहे. भारत राज्यघटनेवर चालतो. ‘मातृभूमी शाळे’च्या लोकांना हे मान्य नाही. शाळेतील शिक्षकांना विचारा की, तुम्हाला शाळा भारतात चालवायची आहे कि वेस्ट इंडिजमध्ये ?’, असे सांगत शाळेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यास पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी हिंदूंना सांगितले. त्यानंतर हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन हनुमान चालीसाचे पठण केले.
शिक्षकांना विचारा की, तुम्हाला शाळा भारतात चालवायची आहे कि वेस्ट इंडिजमध्ये ? – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची चेतावणी
इंदूर (मध्यप्रदेश) येथील शाळेत हिंदु विद्यार्थांना टिळा लावण्यास बंदी !
वाचा : https://t.co/kDrDuskUqx
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये,… pic.twitter.com/89HkqH0gbU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2024
इंदूरच्या ‘स्कीम क्रमांक ७८’मध्ये असलेल्या मातृभूमी शाळेच्या महिला शिक्षिका संध्या यांनी टिळा लावून आणि मनगटावर दोरा बांधून शाळेत आलेल्या एका मुलाला शिवीगाळ केली होती. शाळेतील मुलांनी ही गोष्ट त्यांच्या कुटुंबियांना सांगितली. त्यातील एका पालकाने येथे चालू असलेल्या पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या दरबारात सांगितली.
संपादकीय भूमिकामध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! |