TMC MLA Threatens Hindus : (म्हणे) ‘तुम्ही ३० टक्के, आम्ही ७० टक्के आहोत, गंगेत बुडवून टाकू !’ – तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर

मुर्शिदाबाद (बंगाल) येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांची हिंदूंना धमकी !

तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर

कोलकाता (बंगाल) – मुर्शिदाबादमध्ये तुम्ही (हिंदू) ३० टक्के आणि आम्ही मुसलमान ७० टक्के आहोत. येथे दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, तर मुसलमान शांत बसणार नाहीत. दोन घंट्यांत भागीरथी (गंगा) नदीत तुम्हाला न बुडवल्यास मी राजकारण सोडीन, अशी धमकी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी एका प्रचार सभेत दिली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

(सौजन्य : Zee News)

बंगालमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले, तर काय होईल ?, याचा विचार करा ! – भाजप

कबीर यांच्या धमकीवर भाजप माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करतांना म्हटले की, मुर्शिदाबादमध्ये हिंदूंची संख्या केवळ २८ टक्के आहे. विचार करा, बाकी बंगालमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले, तर काय होईल ? बंगालमध्ये लांगूलचालनाच्या राजकारणाने नवा नीचांक गाठला आहे. या आमदाराला पक्षातून हाकलून देण्याचे धाडस ममता बॅनर्जी करणार का ?

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी हुमायून यांचे हे विधान हिंदूंना पूर्णपणे नष्ट करण्याच्या षड्यंत्राचे संकेत असल्याचे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • भविष्यात बंगालमध्ये हिंदूंची स्थिती कशी असणार आहे, त्याचेच हे विधान दर्शक आहे, हे लक्षात घ्या !
  • निधर्मीवादी राजकीय पक्ष याविषयी तोंड उघडणार नाहीत; कारण त्यांना हिंदूंची नाही, तर मुसलमानांची एकगठ्ठा मते हवी असतात !
  • अशी वक्तव्ये ही दुसरे-तिसरे काही नसून गेल्या १ सहस्र ४०० वर्षांत हिंदूंच्या मुळावर उठलेले जिहादी षड्यंत्र पुढे रेटण्याचाच प्रकार आहे !
  • ‘हिंदूंमुळे लोकशाहीची हत्या होते’, ‘भारतातील मुसलमान भयाखाली जगत आहेत’, अशा प्रकारे गरळओक करणार्‍या अमेरिकी वृत्तसंस्था ‘सी.एन्.एन्.’ला आता यावरून हिंदूंनी जाब विचारला पाहिजे !