सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअस :  नदी, तलाव, ओढे, मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे !

सोलापूर – सोलापूर येथील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून १ मेपासून सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअस झाले आहे. प्रचंड उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून सकाळी १० ते दुपारी ५ पर्यंत घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. प्रचंड उकाड्याने नागरिकांना कामे करणेही अशक्य होत आहे. भूमीतील पाणीपातळी खालावली असून नदी, तलाव, ओढे, मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस झाला; मात्र त्याने लाभ न होता उलट उष्णेतत वाढ झाली !

कोल्हापूर ४० अंश सेल्सिअसकडे !

कोल्हापूर – गेल्या काही दिवसांपासून सांगली-कोल्हापूर शहरांमध्येही तापमानात प्रचंड वाढ होते. कोल्हापूर गेल्या काही दिवसांपासून ४० अंश सेल्सिअसकडे जात आहे. एकीकडे उन्हाळा, तर दुसरीकडे मतदानाचे शेवटचे काही दिवस असल्याने राजकीय वातावरणही तप्त झाले आहे.