ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का ? – चित्रा वाघ, भाजप
ठाकरे गटाच्या विज्ञापनावर भाजपचा आक्षेप !
मुंबई – ‘ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का ?’, असा प्रश्न भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या विज्ञापनात ‘पॉर्न स्टार’ (अश्लील चित्रपटात काम करणार अभिनेता) आहे. या कलाकाराने उल्लू ॲप या वेब सिरिजमध्ये काम केले आहे. त्यात तो महिलांचे शोषण करतो. त्यामुळे ‘अशा कलाकाराला घेऊन विज्ञापन कसे केले ?’, याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले पाहिजे आणि या संबंधी तपास व्हायला पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. उबाठा गटाने सरकारला महिला अत्याचारावर प्रश्न विचारणारे विज्ञापन सिद्ध केले आहे. या विज्ञापनावर वाघ यांनी आक्षेप घेतला आहे.