घराच्या प्रवेशद्वारावर ‘श्रीराम’ ही अक्षरे उमटल्यावर डोंबिवली येथील श्री. रोहिदास कोरगांवकर यांना आलेल्या अनुभूती
१. घराच्या प्रवेशद्वारावर ‘श्रीराम’ ही अक्षरे आणि त्याच्या दोन्ही बाजूंना ‘स्वस्तिक’ चिन्हे उमटलेली दिसणे
‘मागील १७ वर्षांपासून आम्ही डोंबिवली येथे रहात आहोत. २७.१२.२०२३ या दिवशी आमच्या घराच्या प्रवेशद्वारावर ‘श्रीराम’ ही अक्षरे आणि त्याच्या दोन्ही बाजूला ‘स्वस्तिक’ चिन्हेही उमटलेली दिसत आहेत. मागील १७ वर्षांत आम्ही ४ वेळा भिंतीला रंग लावला आहे; परंतु अशी अक्षरे यापूर्वी कधीही दिसली नाहीत.
२. ‘श्रीरामाचा अक्षरांच्या रूपात प्रकट होण्याचा काळ आला आहे’, असे वाटणे आणि तशा अनुभूती येणे
ही अक्षरे दिसू लागल्यापासून आम्हाला वेगळाच आनंद मिळत आहे. ही अक्षरे पाहून मला वाटले, ‘श्रीरामाचा अक्षरांच्या रूपात आमच्याकडे प्रकट होण्याचा काळ आता आला आहे.’ मला तशा अनुभूतीही आल्या.
२ अ. श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या निमंत्रण पत्रिका आणि अक्षता देण्याची सेवा मिळणे : १९.१.२०२४ या दिवशी एका हिंदु धर्माभिमान्यांनी मला विचारले, ‘‘तुमच्या घरी अयोध्या येथील अक्षता, निमंत्रण पत्रिका आणि छायाचित्रे घेऊन येऊ का ? आपण ते तुमच्या वसाहतीत देऊ या.’’ मी लगेच ‘‘हो’’ म्हणालो. ‘श्रीराम आमच्याकडून सेवाही करून घेत आहे’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
२ आ. डोंबिवली येथील सेवांचे नियोजन करणार्या साधिकेने रामनाथी आश्रमात सेवेसाठी जाण्याविषयी विचारणे : डोंबिवली येथील सेवांचे नियोजन करणार्या साधिकेने मला विचारले, ‘‘तुम्ही सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात जाऊ शकता का ?’’ मी लगेच ‘‘हो’’ म्हणालो. तेव्हा माझ्या मनात विचार आले, ‘मला सनातनच्या आश्रमरूपी अयोध्येला जायला मिळणार आहे आणि प.पू. गुरुदेवांच्या रूपात श्रीरामाचे दर्शन होणार आहे.’
२ इ. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी हृदयात भाव आणि भक्ती अनुभवता येणे : २१.१.२०२४ या दिवशी मी रामनाथी आश्रमात पोचलो. २२.१.२०२४ या दिवशी श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण पहातांना मला भाव आणि भक्ती अनुभवता आली.
मला सेवेतील आनंदही अनुभवता आला. या सर्व अनुभूतींसाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. रोहिदास कोरगांवकर (वय ६० वर्षे), डोंबिवली, (९.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |