श्रीकृष्णाचे चित्र, प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
‘एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आमच्याकडून सूक्ष्मातील प्रयोग करून घेण्यात आले. आम्हाला ‘श्रीकृष्णाचे चित्र, प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून काय जाणवते ?’, याचा अभ्यास करायला सांगितला.
१. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहातांना आलेल्या अनुभूती
अ. श्रीकृष्णाच्या चित्राकडे २ मिनिटे लक्षपूर्वक पाहिल्यानंतर मला वाटले, ‘त्या चित्रातील निर्गुण तत्त्वात वाढ झाली आहे.’
आ. त्याचे अलंकार आणि वस्त्रे यांची चमक सूर्यासारखी आहे. ते पुष्कळ अधिक चमकत आहेत.
इ. त्याचे डोळे बोलके आहेत. तो आमच्याशी बोलत आहे.
ई. त्याच्या हातातील सुदर्शनचक्र पुष्कळ गतीने फिरत आहे आणि सर्व साधकांच्या चोहोबाजूंनी संरक्षककवच निर्माण करत आहे.
उ. श्रीकृष्णाच्या चारही बाजूंनी त्याची प्रभावळ वाढत चालली आहे.
ऊ. ते चित्र पाहून ‘जणू काही श्रीकृष्ण साक्षात् समोर उभा आहे. माझ्यावर गतीने आध्यात्मिक स्तरावर उपाय होऊन माझ्यावरील काळ्या (त्रासदायक) शक्तीचे आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवले.
२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे २ मिनिटे पहाणे
अ. ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र जागृत झाले आहे’, असे मला जाणवले.
आ. ‘त्यांच्या हातातील काठी आणि त्यांचे डोळे अन् मस्तक यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.
इ. ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या त्वचेचा रंग पिवळा झाला आहे आणि त्या रंगात वाढ होत आहे’, असे मला जाणवले. मला वाटले, ‘छायाचित्रातील पिवळा रंग सर्वत्र पसरला आहे. त्यांच्या पाठीमागे असलेल्या निळसर रंगातील पांढर्या रंगाचे प्रमाण वाढत चालले आहे आणि ते छायाचित्र निर्गुणाकडे जात आहे.’
ई. ‘प.पू. भक्तराज महाराज साधकांना साधना वाढवण्यासाठी आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे २ मिनिटे पहाणे
अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून ‘ते प्रत्यक्ष गुरुदेव आहेत आणि ते सर्वांकडे पाहून स्मितहास्य करत आहेत’, असे मला जाणवले.
आ. त्यांच्या मुखावर गुलाबी रंग दिसत होता आणि त्या रंगात वाढ होत होती. ‘त्यांचा गुलाबी रंग आम्हा सर्वांमध्ये प्रीती निर्माण करत आहे’, असे मला जाणवले.
इ. त्यांची सुहास्य मुद्रा साधकांच्या मनात आनंदाचा वर्षाव करत होती.
ई. मला चोहीकडून नाद ऐकू येत होता आणि त्यात वाढ होत होती.
उ. माझा ‘कृतज्ञता, कृतज्ञता’ असा नामजप होत होता.’
– सौ. माधवी प्रमोद शर्मा, लुधियाना, पंजाब.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |