Snow On The Moon:चंद्रावर अपेक्षेपेक्षा ५ ते ८ पट अधिक बर्फ !  

‘इस्रो’च्या नवीन अभ्यासातून समोर आली माहिती

बेंगळुरू (कर्नाटक) – चंद्रावर अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. पूर्वी केलेल्या गणनेपेक्षा ५ ते ८ पट अधिक बर्फ आहे; परंतु तो भूमीच्या खाली असून भूमी खोदल्यानंतर तो बाहेर काढता येऊ शकतो. बर्फाद्वारे पाणी मिळवता येऊ शकत असल्याचे याचा वापर चंद्रावर वसाहत निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी माहिती ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने अर्थात् ‘इस्रो’ने दिली आहे.

१. बर्फाचा हा साठा चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवर आहे. त्यामुळे भूमीमध्ये खोदकाम करून बर्फ काढता येऊ शकतो, जेणेकरून भविष्यात मानव चंद्रावर दीर्घकाळ राहू शकेल. जगातील अनेक अवकाश संस्थांना याचा लाभ होईल.

२. इस्रोच्या मते चंद्राच्या उत्तर ध्रुवावर दक्षिण ध्रुवापेक्षा दुप्पट बर्फ आहे. चंद्राच्या ध्रुवावर हा बर्फ कुठून आला ? या प्रश्‍नावर इस्रोचे म्हणणे आहे की, ही इम्ब्रियन काळातील बाब आहे. तेव्हा चंद्र निर्माण होत होता. ज्वालामुखीच्या क्रियांमधून बाहेर पडणारा वायू हळूहळू पृष्ठभागाखाली लाखो वर्षांपासून बर्फाच्या स्वरूपात जमा होत गेला