Justice For Neha : नेहा हत्या प्रकरणी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्केअरवर ‘जस्टिस फॉर नेहा’ असा फलक लावून न्यायाची मागणी !
न्यूयॉर्क – कर्नाटकमधील हुब्बळ्ळी येथील नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या प्रकरणी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ‘टाइम्स स्केअर’वर ‘जस्टिस फॉर नेहा आणि सेव्ह हिंदु गर्ल’, असे फलक लावून न्यायाची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी अनिवासी भारतियांच्या एका गटाने केली आहे. या हत्येत सहभागी असलेल्या नराधमांना शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.