स्वतःच्या मनाच्या स्थितीच्या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे

१. वर्ष २०१२ ते २०२१ या कालावधीत ‘आनंद आजूबाजूला ओसंडून वहात आहे’, असे वाटणे

श्रीमती मनीषा गाडगीळ

‘वर्ष २०१२ ते २०२१ या कालावधीत मला सतत आनंद जाणवत होता. ‘मी कुठेही असले, तरी आनंद माझ्या आजूबाजूला ओसंडून वहात आहे’, असे मला सतत वाटायचे. ‘कधी कधी मी रहात असलेल्या खोलीतही आनंद मावत नाही’, असे मला जाणवत असे.

२. वर्ष २०२२ पासून मनाच्या स्थितीत जाणवलेले पालट

अ. वर्ष २०२२ पासून माझ्या मनात आनंद असतो; परंतु तो इतक्या प्रमाणात जाणवत नाही. आता मन पुष्कळ शांत वाटते.

आ. ‘देवाचे अस्तित्व सतत अंतर्मनात आहे’, असे मला जाणवते. प्रसंग घडतात; पण त्याविषयीचे विचार माझ्या बाह्यमनाला स्पर्श करून निघून जातात. ते माझ्या अंतर्मनापर्यंत जात नाहीत.

इ. मला गुरुकृपेने कोणत्याही प्रसंगाचा ताण येत नाही आणि त्यामुळे माझे मनही चलबिचल होत नाही.

ई. मी सेवा करत असतांना आजूबाजूलाही पुष्कळ शांतता अनुभवता येते. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीच्या कृतज्ञतेने मन भरून येते.

परात्पर गुरु डॉक्टर, ‘मी काहीच करत नसून आपणच सर्वकाही करत आहात’, हे आता मला अनुभवता येते. ‘आपली कृपादृष्टी आम्हा सर्व साधकांवर सतत असू दे’, अशी आपल्या चरणी आर्ततेने आणि शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक