सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदीच पंतप्रधान हवेत ! – केंद्रीय मंत्री नारायण राणे
रत्नागिरी जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या मेळाव्यांना प्रचंड प्रतिसाद
रत्नागिरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला महासत्ता होण्याच्या दिशेने नेत आहेत. महिला, युवक, शेतकरी आणि गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी ते कार्यरत आहेत. असे नेतृत्व पुन्हा या देशाला मिळवून देतांना आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कमळ या चिन्हाला मत द्या, असे आवाहन महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील वाटद आणि कोतवडे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकार्यांचा मेळावा पालकमंत्री उदय सामंत अन् मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की,
१. विरोधक ‘आम्ही राज्यघटना पालटणार’, असा अपप्रचार करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी कधीच जातीभेद आणि धर्मभेद केला नाही. त्यांच्यासाठी माणुसकी हा धर्म आहे, तर महिला, युवक, शेतकरी आणि गरीब या जाती आहेत. या जातीतील लोकांचे जीवनमान वाढावे, यासाठी ते काम करत आहेत.
२. विनामूल्य अन्न, विनामूल्य घर, घराघरांत पाणी, आयुष्यमान भारत योजना, उज्ज्वला गॅस योजना आणि शेतकरी यांच्यासाठी त्यांनी काम केले.
३. भारत देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करणार असतांनाच तो विकसित आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न चालू आहेत.
४. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून अनेक पदांवर मी काम केले आहे. त्या वेळी मी जात धर्म पहिला नाही. साहाय्य मागायला जे कुणी समोर येते, त्या प्रत्येकाला साहाय्य करणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न केले, तेथील जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला; मात्र विरोधकांनी रोजगार देणारे प्रकल्प घालवून तुमची हानी केली आहे.