देवतेचे चित्र आणि श्री गुरूंचे छायािचत्र यांच्यामध्ये आध्यात्मिक दृष्टीकोनातून असलेला भेद !
‘मनुष्यातील सदसद्विवेकबुद्धी जेव्हा जागृत होते, तेव्हा त्याला भगवंताची उपासना करण्याची प्रेरणा मिळते आणि तो प्रकृतीनुसार ध्यानयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग इत्यादी योगमार्गांनुसार साधना करू लागतो.
१. भक्तीमार्गानुसार साधना करणार्या जिवाला स्थुलातून देवतेचे चित्र किंवा श्री गुरूंचे छायाचित्र यांची उपासनेसाठी आवश्यकता भासणे
१ अ. भक्तीमार्गानुसार साधना करणार्या जिवाला देवतेची प्रतिमा किंवा मूर्ती यांची आवश्यकता भासणे : जेव्हा तो भक्तीमार्गानुसार साधना करू लागतो, तेव्हा त्याच्या साधनेची वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे होऊ लागते. त्यामुळे त्याला उपासनेसाठी देवतेची प्रतिमा किंवा मूर्ती याची आवश्यकता भासते. त्यामुळे देवतांच्या मूर्ती आणि त्यांची चित्रे यांच्या निर्मितीची परंपरा आरंभ झाली.
१ आ. साधकाच्या जीवनात गुरु आल्यानंतर त्याला त्याचे गुरुदेव अन्य देवतांप्रमाणे पूजनीय आणि वंदनीय वाटू लागणे : त्याचप्रमाणे साधकाच्या जीवनात गुरु येऊन ते त्याला विशिष्ट साधनामार्गानुसार साधना करण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यामुळे शिष्याला त्याचे गुरु पूजनीय आणि वंदनीय असल्यामुळे तो त्यांच्या छायाचित्राचेही पूजन करून त्यांची उपासना करू लागतो. अशा प्रकारे देवतांची चित्रे आणि श्री गुरूंचे छायाचित्र या दोन्हींचे स्थान उपासकाच्या मनमंदिरासह घरातील देवघरातही असते. देवतेचे चित्र आणि व्यक्तीचे छायाचित्र यांच्यामध्ये आध्यात्मिक दृष्टीकोनातून पुढील भेद जाणवतो.
२. देवतेचे चित्र आणि श्री गुरूंचे छायाचित्र यांच्यातील तौलनिक भेद
३. गुरु आणि देव !
देव असतो निर्गुण निराकार ।
गुरु असती सगुण साकार ।। १ ।।
देव देतो भक्तास दैवी बळ ।
गुरु वाढवतात शिष्याचे आत्मबळ ।। २ ।।
देव करतो संकटांपासून रक्षण ।
गुरु करतात मोक्षप्राप्तीसाठी मार्गदर्शन ।। ३ ।।
देवामुळे गुरु येतात शिष्याच्या जीवनात ।
गुरुकृपेमुळे शिष्य विलीन होतो भगवंतात ।। ४ ।।
देवाच्या कृपेने भक्ताला मिळते शिष्यत्व ।
श्री गुरूंच्या कृपेमुळे शिष्याला लाभते देवत्व ।। ५ ।।
कृतज्ञता आणि प्रार्थना
श्री गुरूंच्या कृपेमुळे ‘देव आणि गुरु’ यांचे सूक्ष्म स्तरावरील अलौकिकत्व उमजले, यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘श्री गुरूंची कृपा आम्हा साधकांवर अशीच राहो’, हीच त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के (वय ४० वर्षे, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२४)
|