Goldy Brar Killed : खलिस्तानी आतंकवादी गोल्डी ब्रार याची अमेरिकेत हत्या !

  • हत्येला अद्याप अधिकृत यंत्रणांकडून दुजोरा नाही

  • गोल्डी ब्रार होता सिद्धू मूसेवाला हत्येचा मुख्य आरोपी  

खलिस्तानी आतंकवादी गोल्डी ब्रार

नवी देहली – पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सतींदरजीत सिंह उपाख्य गोल्डी ब्रार याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येचे दायित्व त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीच्या डल्ला-लखबीरने स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. सामाजिक माध्यमांतून हे वृत्त प्रसारित झाले असले, तरी अद्याप याला सरकारी स्तरावरून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

गोल्डी ब्रार हा लॉरेन्स टोळीचा कुख्यात गुंड होता. सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील मुख्य संशयित म्हणून पंजाब पोलिसांना, तसेच इतर राज्यांच्या पोलिसांना तो हवा होता. गोल्डीला केंद्र सरकारने ‘खलिस्तानी आतंकवादी’ घोषित केले होते. तो खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘बाबर खालसा’शी संबंधित होता. तो अनेक हत्या, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि आतंकवादी कारवाया यांमध्येही सहभागी होता.