CG Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये १० नक्षलवादी ठार !

नारायणपूर (छत्तीसगड) – येथील अबुझमाड भागात सुरक्षादलांनी नक्षलवाद्यांच्या तळावर २४ घंटे केलेल्या कारवाईनंतर १० नक्षलवादी ठार झाले. यामध्ये ३ महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.

ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून एके-४७ सारखी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी १६ एप्रिल या दिवशी राज्यातील कांकेर जिल्ह्यात २९ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले होते.