‘कीबोर्ड’च्या ‘स्ट्रोक’वरून भ्रमणभाषमधील ‘बँकिंग’ आणि ‘सोशल मीडिया पासवर्ड’ चोरण्याची नवीन पद्धत !
सॅमसंग, शाओमी, ओप्पो आणि विवो सारख्या लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडवर हॅकिंग होत असल्याचे उघडकीस !
पुणे – हॅकिंगच्या नवनवीन पद्धतींची माहिती प्रतिदिन समोर येत आहे. अशीच एक नवीन पद्धत आता समोर आली आहे. ज्यात सॅमसंग, शाओमी, ओप्पो आणि विवो यांसारख्या लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडवर हॅकिंग होत असल्याचे समोर आले आहे. भ्रमणभाषमध्ये तुमची वैयक्तिक माहिती तर असतेच त्याचसह ‘बॅकिंग सर्व्हिस’ही असते; परंतु आता दिग्गज स्मार्टफोनचे ब्रँड सॅमसंग, शाओमी, विवो आणि ओप्पो यांविषयी एक खुलासा झाला आहे, ज्यात ‘की बोर्ड’च्या ‘स्ट्रोक’वरून भ्रमणभाषमधील ‘बँकिंग’ (अधिकोषाच्या संदर्भात ऑनलाईन प्रक्रिया) आणि ‘सोशल मीडिया पासवर्ड’ चोरले जात आहेत.
अशी होत आहे ‘पासवर्ड’ची चोरी !
जेव्हा तुम्ही स्मार्टफोनवरून ‘बॅकिंग पेमेंट’ किंवा ‘सोशल मीडिया अॅप’ ‘लॉग-इन’ करता त्यासाठी तुम्हाला ‘लॉग-इन आयडी’ आणि पासवर्ड टाकावा लागतो; परंतु काही विशेष कीबोर्ड बनवले जात आहेत, ज्यांच्या माध्यमातून ओळखले जात आहे की, तुम्ही कोणता ‘लॉग-इन आयडी’ आणि पासवर्ड टाकला आहे. यात ‘कीबोर्ड स्ट्रोक’ ‘रजिस्टर’ (नोंद) होतात. ‘सिटिजन लॅब’च्या अगदी अलीकडच्या अहवालानुसार अनेक ‘कीबोर्ड अॅप्स’ची नावे समोर आली आहेत, ज्यात सुरक्षा धोके आहेत. तसेच दावा करण्यात आला आहे की, हे अॅप्स ‘किस्ट्रोक’ गुप्तता उघड करू शकतात. यापेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे या कीबोर्ड अॅप्सचा वापर सॅमसंग, शाओमी यांसारख्या स्मार्टफोनमध्येही करण्यात येत आहे.
कोणत्या ‘की बोर्ड अॅप्स’चा वापर ठरू शकतो धोकादायक ?
सॅमसंग की बोर्ड, विवो आणि ओप्पोचे ‘सोगो आईएमे’ कीबोर्ड हे धोकादायक आहेत. अहवालानुसार अशा प्रकारचे ‘की बोर्ड अॅप्स’ मोठया प्रमाणात चीनमध्ये वापरले जातात. जे की बोर्ड ‘स्ट्रोक सर्व्हर’मध्ये नोंद करतात. या ‘की बोर्ड स्ट्रोक’च्या माहितीमध्ये कोणत्या अॅप किंवा संकेतस्थळावर कोणते शब्द वापरले गेले, याची माहिती असते. या माहितीवरून सामाजिक माध्यम आणि अधिकोषाशी संबंधित तपशील सहज वेगळे करता येतात. अहवालानुसार या सुरक्षा त्रुटींमुळे जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यांवर परिणाम होऊ शकतो. क्लाउड-आधारित कीबोर्ड फीचर्स वापरणार्यांना सर्वाधिक धोका असतो.
यावर उपाय काय ?
सतत तुमचे ‘कीबोर्ड अॅप’ अद्ययावत् करत रहा. अशा की बोर्ड अॅप्सचा वापर करा, जे स्ट्रोक ‘डेटा डिव्हाइस’वर ठेवतात.