सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन
कणकवली – लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे या दिवशी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीसदलाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी संचलन करण्यात आले.
तालुक्यातील खारेपाटण येथे करण्यात आलेल्या पोलीस संचलनात स्थानिक पोलिसांसह गोंदिया येथील राज्य राखीव पोलीस दलाचे मिळून ९० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ आणि परुळे बाजार येथे स्थानिक पोलिसांसह सुरक्षादलाच्या जवानांनी संचलन केले. सावंतवाडी शहरात स्थानिक पोलीस आणि त्रिपुरा रायफल सुरक्षादलाचे जवान, अशा एकूण ८२ जणांनी संचलन केले. बांदा शहरात स्थानिक पोलीस, दंगल नियंत्रण पथक आणि राज्य राखीव पोलीसदलाचे जवान यांनी संचलन केले.