अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सोशल मिडिया चालवणार्यांवर गुन्हा !
मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया चालवणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुंबईतील भाजपचे सचिव प्रतीक कर्पे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती.
महाराष्ट्र काँग्रेसच्या युथ एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सामाजिक प्रसारमाध्यमांवरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती यांचे आरक्षण रहित करण्याविषयी वक्तव्य केल्याचे दाखवण्यात आले आहे. याविषयी भाजपकडून करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारे आरक्षण रहित करण्याविषयी अमित शहा यांनी वक्तव्य केले नसल्याचे प्रतीक कर्पे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसकडे आता पर्यायच राहिला नसल्याने विरोधकांच्या अशा खोट्या चित्रफीती करणेही तिने चालू केले आहे ! |