Syrian Muslim refugees in Turkey: सीरियातील सर्वाधिक म्हणजे ३५ लाख मुसलमान शरणार्थींनी तुर्कीयेत घेतला आश्रय !

हॅमबर्ग (जर्मनी) – १० वर्षांपूर्वी सीरियामध्ये झालेले यादवी युद्ध आणि इस्लामिक स्टेटचा उदय यांमुळे तेथील लक्षावधी मुसलमानांनी युरोपमध्ये आश्रय घ्यायला आरंभ केला. केवळ सीरियाच नाही, तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, सुदान आणि उत्तर आफ्रिकेतील काही इस्लामी देशांनीसुद्धा युरोप, तसेच जवळपासच्या अन्य मुसलमान देशांमध्ये जाण्यास आरंभले. केवळ सीरियाचा विचार करता जर्मनी येथील ‘स्टॅटिस्टा’ नावाच्या आस्थापनाने तेथून विविध देशांची शरण घेतलेल्या लोकांची आकडेवारी घोषित केली आहे. त्याच्या अहवालानुसार सर्वाधिक सीरियातील मुसलमानांनी तुर्कीये या युरोप आणि आशिया अशा दोन्ही खंडात असलेल्या देशात शरण घेतली. येथे सध्या ३५ लाखांहून अधिक सीरियन शरणार्थी रहात आहेत.

या आकडेवारीनुसार दुसर्‍या क्रमांकावर लेबनॉन असून तेथे ८ लाख १४ सहस्र सीरियन मुसलमान रहात आहेत. त्यानंतर जॉर्डन ६ लाख ६० सहस्र, जर्मनी ५ लाख २२ सहस्र, इराक २ लाख ५७ सहस्र, स्विडन १ लाख ११ सहस्र, सुदान ८३ सहस्र, ऑस्ट्रिया ७४ सहस्र, नेदरलँड्स ४५ सहस्र १४१, ग्रीस ४३ सहस्र, तर फ्रान्समध्ये ४० सहस्र सीरियन शरणार्थी वास करत आहेत.