Covishield Vaccine Side Effect : ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो !
|
लंडन (ब्रिटन) – कोरोनाविरोधात वापरण्यात आलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे मानवी शरिरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी स्वीकृती या लसीची निर्मिती करणार्या ‘अॅस्ट्राझेनेका’ या आस्थापनाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली. या आस्थापनाने न्यायालयात म्हटले की, ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे ‘थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम’ची लक्षणे आढळू शकतात. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येणे, ब्रेन स्ट्रोक (मेंदूंचा झटका) येणे, प्लेटलेट्स (रक्तातील एक प्रकारचा घटक) अल्प होणे आदी गोष्टी होऊ शकतात; मात्र हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होऊ शकते. त्यामुळे सामान्य लोकांना घाबरण्याची आवश्यकता नाही.
#Covishield Vaccine Side Effect : ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो !#AstraZeneca आस्थापनाची #Britain मधील न्यायालयात स्वीकृती !
दुर्मिळ प्रकरणातच असे होऊ शकते, त्यामुळे घाबरू नये ! – अॅस्ट्राझेनेकाचा दावा
https://t.co/3mWhbY541G#HeartAttack #Covishield pic.twitter.com/u6c3oUqchv— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 30, 2024
विशेष म्हणजे भारतात ‘अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ’ (ब्रिटन) आणि ‘सिरम इन्स्टिट्यूट’ (पुणे) यांनी मिळून ‘कोव्हिशिल्ड’ ही लस सिद्ध केली होती. त्यानंतर ही लस भारतासह जगभरातील नागरिकांना देण्यात आली होती.
काय आहे प्रकरण ?१. ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने अॅस्ट्राझेनेका आस्थापनाच्या विरोधात न्यायालयात खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे. अॅस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर स्कॉट याच्या मेंदूला हानी पोचल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही लस घेतल्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक विकारांचा सामना करावा लागत आहेे, असे त्यांनी म्हटले आहे. २. जेमी स्कॉट यांच्याप्रमाणेच इतर अनेकांनीही लसीच्या दुष्परिणामांविषयी न्यायालयात तक्रारी केल्या आहेत. ते आता लसीविषयी त्यांना आलेल्या अडचणींच्या संदर्भात भरपाईची मागणी करत आहेत. दुसरीकडे आस्थापनाने स्वीकृती देऊनही भरपाई देण्याला नकार दिला आहे. आस्थापनाचे म्हणणे आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यानंतर ही समस्या काही लोकांमध्ये आढळू शकते. ३. सध्या ही लस सुरक्षिततेच्या कारणास्तव ब्रिटनमध्ये दिली जात नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा दावा मान्य केल्यास आस्थापना मोठी रक्कम भरावी लागू शकते. |