शिक्रापूर (पुणे) येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !
शिक्रापूर (जिल्हा पुणे) – शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे पोलीस भरतीची सिद्धता करणार्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सलीम शेख याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (वासनांधांवर कारवाई करण्यासाठी पोलीस कृतीशील केव्हा होणार ? – संपादक) पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रिवष्ट केली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी सलीम यांची ३ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. ऑगस्ट २०२३ पासून सलीम मुलीचा पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न करत होता. मुलीने ‘मला तुझ्यासोबत बोलायचे नाही’, असे सांगूनही तो वारंवार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून तिला त्रास देत होता.