आनंदमय जीवनासाठी दोषनिर्मूलन आणि गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. मधुलिका गोयल, सनातन संस्था
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘अग्रेसन पब्लिक स्कूल’मध्ये ‘तणावमुक्ती’ विषयावर पार पडली कार्यशाळा !
जयपूर (राजस्थान) – आपल्यातील दोषांचे अधिक्य आणि सद्गुणांचा अभाव आपले जीवन तणावग्रस्त बनवते. आपण कोणत्याही परिस्थितीकडे कसे पहातो ?, हे आपले गुण आणि दोष यांवर अवलंबून आहे. त्यामुळे दोषनिर्मूलनासह गुणसंवर्धन करण्याचा प्रयत्न केल्यास आपण निश्चितपणे आनंदमय जीवन जगू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. मधुलिका गोयल यांनी केले. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘अग्रेसन पब्लिक स्कूल’मध्ये ‘तणावमुक्ती’ विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यशाळेला शाळेचे सचिव श्री. कमल नानूवाला, प्राचार्या अमिता कुलवाल, श्री. राकेश गर्ग यांच्यासह शाळेतील अनेक शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.