अहंशून्य, नम्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेले पंढरपूर येथील डॉ. श्रीपाद पेठकर !
‘१८.२.२०२४ या दिवशी माझी पंढरपूर येथील डॉ. श्रीपाद पेठकर यांच्याशी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात भेट झाली. त्यांना तीव्र स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास आहे; परंतु त्यांना भेटताक्षणी माझ्या लक्षात आली, ती त्यांची प्रसन्नमुद्रा ! त्यांना पहाताक्षणी माझ्या मनात चालू असलेले विचार थांबले. त्यांच्या हास्यामुळे माझेही मन प्रसन्न झाले. त्यांच्याशी बोलतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचा त्यांचा भाव जाणवत होता. त्यांच्याशी बोलण्यामुळे माझाही भाव जागृत झाला. तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्यांच्यातील अहंशून्यता, नम्रता आणि प्रेमळ वृत्ती त्यांच्याशी बोलतांना मला जाणवत होती.’
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.२.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |