परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. श्रिया राजंदेकर हिला आलेली चैतन्याची प्रचीती !
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला.
१. सत्संगात भावस्थिती अनुभवणे
मी प.पू. गुरुदेवांना पाहिल्यावर माझी भावजागृती झाली. त्या वेळी मला ‘प.पू. गुरुदेवांचे रूप डोळ्यांमध्ये साठवत राहूया’, असे वाटत होते. मी निर्विचार स्थिती अनुभवत होते. मला आनंद जाणवत होता. माझी प.पू. गुरुदेवांप्रती अखंड कृतज्ञता व्यक्त होत होती.
२. मला सत्संगात पुष्कळ शांत वाटत होते
मला आनंदही मोठ्या प्रमाणात जाणवत होता. प.पू. गुरुदेव अधून मधून माझ्याकडे पहात होते. त्या वेळी ‘त्यांच्यातील चैतन्याने माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण होत आहे’, असे मला जाणवत होते.
३. सत्संगात मला वेळेचे भान राहिले नाही
‘मला प.पू. गुरुदेवांना अनुभवायचे आहे आणि त्यांचे रूप माझ्या डोळ्यांमध्ये साठवायचे आहे’, अशी उत्कटता सत्संगाच्या वेळी माझ्या मनात अधून मधून निर्माण होत होती.
४. प.पू. गुरुदेवांच्याच कृपेमुळे मला आतापर्यंतही त्यांचे चैतन्य अनुभवता येत आहे. ‘त्यांच्या चैतन्याचे संरक्षककवच माझ्याभोवती आहे’, असे मला जाणवत आहे.
५. कृतज्ञता
माझ्याकडून सत्संग आणि प.पू. गुरुदेव यांच्या प्रती अजूनही कृतज्ञता व्यक्त होते. ‘प.पू. गुरुदेव, आपल्याच अनंत कृपेने मला आपला सत्संग अनुभवता आला. या सत्संगाच्या माध्यमातून आपण मला अनुभूती दिल्या आणि हे लिखाणही तुम्हीच करून घेतले’, त्याबद्दल आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’
– कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १२ वर्षे), फोंडा, गोवा.