‘ट्रोलिंग’ केल्यास थेट २ महिन्यांचा कारावास द्या ! – महेश मांजरेकर, अभिनेते, निर्माते

महेश मांजरेकर

पुणे – माझे काम आवडले नाही, तर त्याविषयी ट्रोल (समाजमाध्यमातून होणारी टीका) झाले, तर चालेल; पण माझ्या आई-वडिलांविषयी बोलले, तर मला चालणार नाही. अशा वेळी मी गप्प बसत नाही. मुलांना किंवा घरच्यांना त्याच्यात ओढू नका. त्याविषयी कायदा यायला हवा. शिवीगाळ असेल तर त्यांना २ महिने कारावास द्या. असा नियम काढायला हवा. त्याची ‘केस’ (न्यायालयामध्ये तक्रार) पण करू नका. कारण न्यायालयामध्ये पुष्कळ खटले आहेत. केवळ समजले, तर लगेच त्याला कारावासात टाका आणि तरच ते बंद होईल. कुणी काय नाव ठेवावे, हा त्याचा प्रश्न आहे, अशा शब्दांत अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘ट्रोलिंग’वर समज दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्यावर २७ एप्रिल या दिवशी महेश मांजरेकर आले होते, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. मांजरेकर पुढे म्हणाले की, राज्यात चित्रपट व्यवसाय वाढवायचा असेल, तर चित्रपटगृहे वाढली पाहिजेत.