Love Jihad Suicide In MP : हॉटेलच्या खोलीत सापडला हिंदु युवतीचा मृतदेह : प्रियकर जुनैद खानने केले आत्महत्येसाठी प्रवृत्त !
पिथमपूर (मध्यप्रदेश) येथील घटना
भोपाळ (मध्यप्रदेश) – लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडल्याच्या घटनांत आता पुन्हा एकदा वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. कर्नाटकमधील हुब्बळ्ळी येथील नेहा हिरेमठची हत्या असो अथवा देहलीतील सरिता शर्मा या पीडितेच्या आईची हत्या असो, आता असाच प्रकार मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात असलेल्या पिथमपूर येथे झाल्याचे समोर आले आहे. शहरातील हॉटेल ‘वाटिका’ येथे एका खोलीत एका २४ वर्षीय हिंदु युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. जुनैद खान नावाच्या युवकासमवेत ती या हॉटेलमध्ये आली होती, असे पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी जुनैद खानविरुद्ध बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. युवतीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. या घटनेची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हिंदुत्वनिष्ठांनी जुनैदच्या विरोधात हत्येचा खटला प्रविष्ट (दाखल) करण्याची मागणी केली.
Hindu girl's lifeless body found in hotel room ; Instigated by lover Junaid Khan to commit suicide
📍 Pithampur (Madhya Pradesh)A few days ago, there were reports of a Mu$l!m lover brutally torturing his Hindu lover in order to grab her property in Guna, Madhya Pradesh.
Such… pic.twitter.com/eq6nKbIZ6W
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 29, 2024
या प्रकरणी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना पिथमपूर शहर पोलीस अधीक्षक अमित कुमार मिश्रा म्हणाले की, पीडितेने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. दोघेही इंदूरच्या महुगावचे रहिवासी असून त्यांचे ५ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. मुलगी तिचा प्रियकर जुनैदवर विवाहासाठी दबाव आणत होती; मात्र तो कोणत्या ना कोणत्या बहाण्याने ते टाळत होता.
मध्यप्रदेश राज्यात लव्ह जिहादसंबंधी घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने मध्यप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जयदीप प्रसाद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.
संपादकीय भूमिकाकाही दिवसांपूर्वीच राज्यातील गुना येथेही एका मुसलमान प्रियकराने हिंदु प्रेयसीची भूमी हडपण्यासाठी तिच्यावर अनन्वित अत्याचार केल्याचे वृत्त होते. मध्यप्रदेश पोलिसांकडून अशा लव्ह जिहाद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याची जोरदार मागणी केल्यासच अशा घटना थांबतील ! |