Owaisi On Muslim Population : (म्हणे) ‘देशात मुसलमान लोक सर्वाधिक गर्भनिरोधकाचा वापर करतात !’ – असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसी यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर !
भाग्यनगर (तेलंगाणा) – देशात मुसलमान सर्वाधिक गर्भनिरोधकाचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येत घट होत आहे, असे प्रत्युत्तर एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि येथील उमेदवार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमधील एका सभेत म्हटले होते की, ‘देशात काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा अधिक मुले असणार्यांना (मुसलमानांना) वाटून टाकेल.’ यावरून ओवैसी यांनी वरील विधान केले.
'Mu$|!m$ use the most contraceptives in the country'
– Asaduddin Owaisi's reply to Prime Minister Modi.
👉 This is an example of shamelessly lying and being unapologetic about it.
Hindus should be aware that, according to the Government statistics, In 1950, Mu$|!m$ accounted… pic.twitter.com/I3tZ1awKru
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 29, 2024
ओवैसी म्हणाले की,
१. पंतप्रधान मोदी खोटे बोलत असून ते देशात मुसलमान आणि दलित यांच्या विरोधात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. ही ‘मोदी गॅरंटी’ आहे.
२. पंतप्रधान म्हणतात की, देशात मुसलमान लोक सर्वाधिक मुले जन्माला घालतात; पण नरेंद्र मोदी यांना ६ भाऊ आहेत, तर अमित शहा यांनाही ६ बहिणी आहेत. तरीही हे लोक मुसलमानांच्या मुलांविषयी बोलतात.
३. मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार देशात मुसलमानांचेच प्रजननाचे प्रमाण सर्वांत अल्प आहे. दिवसेंदिवस मुसलमानांची लोकसंख्याही घटत आहे.
४. महत्त्वाचे म्हणजे देशात सर्वाधिक गर्भनिरोधक कोण वापरत असेल, तर ते मुसलमान लोक वापरतात, असे मी म्हणत नाही, तर मोदी सरकारची आकडेवारी सांगते; मात्र तरीही ‘मुसलमान लोक अधिक मुले जन्माला घालतात’, असे मोदी म्हणत आहेत. याचे कारण भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या लोकांना हिंदूंच्या मनात भीती निर्माण करायची आहे. ‘एका विशिष्ट काळात देशात मुसलमानांची संख्या हिंदूपेक्षा अधिक होईल’, अशी भीती ते हिंदूंना दाखवतात; मात्र असे कधीही होणार नाही.
संपादकीय भूमिका‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे ओवैसी ! वर्ष १९५० मध्ये देशात ९ टक्के असणारे मुसलमान आज १४ टक्क्यांहून अधिक, म्हणजे २० कोटी झाले आहे, तर हिंदू ८४ टक्क्यांवरून ७८ टक्क्यांवर आले आहेत. ही सरकारी आकडेवारी आहे. हे हिंदूंनी लक्षात ठेवावे ! |