TMC Attack On BJP : बंगालमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण – १५ जण घायाळ
भाजपकडून तृणमूल काँग्रेसवर आरोप
कोलकाता (बंगाल) – भाजपने दावा केला आहे की, सिलिगुडीमध्ये ‘जय श्रीराम’ अशी घोषणा दिल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमण करण्यात आले. या घटनेमुळे भाजपने सिलिगुडी बंदचे आवाहन केले आहे.
२८ एप्रिलला ‘जय श्रीराम’ म्हणत भाजपचे बूथ अध्यक्ष नंद किशोर, त्यांचे कुटुंब आणि इतर अनेक कार्यकर्ते यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे. यात एकूण १५ जण घायाळ झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. भाजपने म्हटले की, पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. आक्रमणानंतर आम्ही पोलीस ठाण्याला घेराव घातला. या आक्रमणाच्या प्रकरणी किती जणांना अटक झाली ? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
सौजन्य The Economic Times
संपादकीय भूमिकाबंगाल म्हणजे हिंदूंसाठी इस्लामी प्रांत झाल्याचेच दर्शक आहे. बंगालमधील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे ! |