Muslim Protesters In Germany : जर्मनीमध्ये शेकडो मुसलमानांकडून इस्लामी राजवटीसाठी काढण्यात आला मोर्चा !
‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) देण्यात आल्या घोषणा
बर्लिन (जर्मनी) – जर्मनीच्या सेंट जॉर्ज शहरात शेकडो मुसलमानांनी रस्त्यावर उतरून इस्लामी (खिलाफत) राजवटीची मागणी केली. ही घटना २७ एप्रिलला घडली. ‘मुस्लिम इंटरएक्टिव्ह’ या इस्लामी आतंकवादी संघटनेशी संबंधित रहीम बोटेंग याने या मोर्चाचे आयोजन केले होते. सामाजिक माध्यमांतून या मोर्चाचे व्हिडिओ प्रसारित झाले आहे. या वेळी मुसलमानांच्या हातात ‘जर्मनी : मूल्यांवर हुकूमशाही’, ‘कलिफाट इस्ट डाय लोसुंग’ (खलिफात हा उपाय) आणि ‘पॅलेस्टाईनने माहिती युद्ध जिंकले आहे’ असे फलक होतेे. ते ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणाही देत होते.
सौजन्य : euronews
१. मोर्चात सहभागी मुसलमानांनी दावा केला आहे की, जर्मन सरकारच्या इस्लामद्वेषी धोरणांमुळे इस्रायल-हमास युद्धामध्ये जर्मनीतील प्रसारमाध्यमांनी मुसलमानांच्या विरोधात प्रचार केला.
२. जर्मनीच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मोर्चा आयोजित करणारा रहीम हा जर्मनीचा नागरिक आहे. त्याने ८ वर्षांपूर्वी इस्लामचा स्वीकार केला आणि आता तो स्वतःला इमाम म्हणवतो. तो हॅम्बर्ग विद्यापिठात शिकत आहे; परंतु तो इन्स्टाग्राम आणि टिकटॉक या माध्यमांवर एक मोठा इस्लामी प्रचारक बनला आहे.
संपादकीय भूमिकायुरोपमध्ये शरणार्थी मुसलमान मोठी डोकेदुखी बनली असून पुढील काही दशकांनंतर युरोपमधील लहान लहान ख्रिस्ती देश हे इस्लामी देश बनल्यास आश्चर्य वाटू नये ! |