नागपूर येथे बसमध्ये तिकिटाचे पैसे मागितल्याने वाहकावर चाकूचे आक्रमण करणार्या धर्मांध मुसलमान प्रवाशास अटक !
नागपूर – नागपूर-छत्रपती संभाजीनगर या बसमधून प्रवास करणारा फिरोज शेख याच्याकडे तिकिटाच्या पैशाची मागणी केल्याच्या कारणावरून शेख याने बसचे वाहक योगेश काळे यांच्यावर चाकूचे आक्रमण करून त्यांना गंभीर घायाळ केले आहे. काळे यांना उपचारासाठी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी फिरोज याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. बस वाहक योगेश काळे यांनी नागपूर ते कोंढाळीपर्यंत प्रवास करणारा धर्मांध फिरोज शेख यास तिकिटाची रक्कम मागितली. फिरोज याने ‘ऑनलाईन’ तिकीट काढले असल्याचे सांगितले. त्या वेळी वाहकाने भ्रमणभाषवर आलेला संदेश दाखवण्याची मागणी प्रवाशी फिरोजकडे केली. तरीही त्याने ते दाखवले नाही.
सदर बस कोंढाळी जवळच्या रिंगणाबोडी गावाजवळ पोचली, तरीही फिरोज याने बस वाहकाला ना तिकीट दाखवले, ना तिकिटाची रक्कम देऊन दुसरे तिकीट घेतले. त्यामुळे वाहक योगेश काळे यांनी फिरोजकडे तिकिटाची रक्कम मागितली. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. धर्मांध फिरोज याने योगेश काळे यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर चाकूचे आक्रमण केले. काही प्रवाशांनी धैर्य दाखवत फिरोज याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी फिरोज याने त्याचा भ्रमणभाष संच आणि चाकू चालत्या बसमधून फेकून दिला आहे. (धूर्त धर्मांध ! – संपादक)
संपादकीय भूमिकाही आहे धर्मांध मुसलमानांची मग्रुरी ! अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली पाहिजे; जेणेकरून पुन्हा ते असे कृत्य करण्याचे धाडस दाखवणार नाहीत. |