पुणे येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या प्रकरणी तिघांवर गुन्हे नोंद !
छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुली असुरक्षित !
दोघांना अटक, एक पसार !
पुणे – विवाहाच्या आमीषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी वैभव मेरगो, प्रशांत बनसोडे आणि सुमील वाल्मिकी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्यातील मेरगो आणि बनसोडे यांना अटक करण्यात आली असून वाल्मिकी पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणी मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. मेरगोचे चॉकलेट विक्रीचे आस्थापन आहे. बनसोडे वाहतूकदार आहे. मेरगोने मुलीला लग्नाचे आमीष दाखवून साथीदारांच्या साहाय्याने १८ सप्टेंबर २०२२ या दिवशी पळवून नेले होते. मुलगी अल्पवयीन असूनही तिच्यावर अत्याचार केले. त्याची चित्रफीत सिद्ध करून मुलीला धमकावले. आई आणि भावाचे अपहरण करून त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.