नवी मुंबईत गोमांस विक्री करणार्या दोघांना अटक !
नवी मुंबई – सीबीडी येथे बेकायदेशीररित्या गोमांस विक्री करणार्या २ जणांना सीबीडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात गोमांस, गोवंशीय यांचे मांस विक्री करणे, त्यांची हत्या करणे आणि वाहतूक करणे यांसाठी बंदी आहे. अशी बेकायदेशीर कृत्य करणार्यांनी हे वेळीच थांबवले नाही, तर त्यांना बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या पद्धतीने चोख उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे नवी मुंबई जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणी मोहसीन अब्दुलहक कुरेशी आणि मोहंमद शफी शेख छन्नू यांना अटक करण्यात आली आहे.
गोरक्षक प्रतिक ननावरे यांना सीबीडी सेक्टर १ येथे राज्यात प्रतिबंधित असलेले गोमांस आणि गोवंशीय यांचे मांस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी त्याची माहिती विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांना दिली. या कार्यकर्त्यांनी ही माहिती पोलिसांना देऊन वरील ठिकाणी धाड टाकली. तेथे मोहसीन अब्दुलहक कुरेशी हा मे. अनम बुफेन शाँप या ठिकाणी गायी, बैलाचे मटन विकताना आढळून आला.
संपादकीय भूमिका :
|